
डावखुरा अभिषेक शर्मा युवराज सिंगचा चेला आहे. युवराज सिंगने अनेकदा त्याच्या फलंदाजीची स्तुती केली आहे. युवराजला अभिप्रेत असलेली फलंदाजी अभिषेक शर्माने केली. 250 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं. तसेच युवराज सिंगच्या 16 वर्षे जुन्या विक्रम मोडला.

अभिषेक शर्माने 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. 255 च्या स्ट्राईक रेटने त्याने 50 धावा पूर्ण केल्या. यात त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारले. भारतीय खेळाडूंच्या यादीत हे तिसरं जलद अर्धशतक आहे. यासह त्याने युवराजच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

युवराज सिंगने 2009 साली श्रीलंकेविरुदद्ध 20 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. गौतम गंभीरने 19, तर सूर्यकुमार यादवने 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. अभिषेक शर्माने युवराजच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

अभिषेक शर्माने 34 चेंडूत 79 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 232.35 चा होता. यावेळी 5 चौकार आणि 8 षटकार मारले. इंग्लंडविरुद्ध 8 षटकार मारणारा पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी युवराज सिंगने 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये 7 षटकार मारले होते. यात 6 चेंडूत 6 षटकारांचा समावेश आहे.

इंग्लंडने टीम इंडियासमोर विजयासाठी 133 धावांचं आव्हान दिलं होतं. अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळे हे आव्हान भारताने 12.5 षटकात पूर्ण केलं. भारताने 3 गडी गमवून हे लक्ष्य गाठलं. (सर्व फोटो- बीसीसीआय)