
अभिषेक शर्मासाठी 2025 हे वर्ष खूपच चांगलं गेलं. त्याने या वर्षात आक्रमक फलंदाजी करून क्रीडारसिकांचं चांगलंच मनोरंजन केलं. त्याने आपल्या आक्रमक खेळीने टीम इंडियाला सामने सहज जिंकून दिले. आता अभिषेक शर्मा पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. (फोटो- PTI)

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेत अभिषेक शर्माकडे नंबर 1 होण्याची संधी आहे. अभिषेक शर्माचा फॉर्म पाहता त्यासाठी हे गोष्ट सोपी आहे असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. (फोटो- PTI)

अभिषेक शर्माने 2025 या वर्षात 17 डावांमध्ये 756 धावा केल्या आहेत. त्याने 47.3 च्या सरासरीने आणि 196.4 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. आता त्या या वर्षात सर्वाधिक धावा करण्यासाठी फक्त 181 धावांची गरज आहे. पाच सामन्यात त्याच्यासाठी हे गणित सोपं आहे. (फोटो- PTI)

2025 या वर्षात झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट हा सध्या आघाडीवर असून त्याने 25 डावात 936 धावा केल्या आहेत. तर बांगलादेशच्या तन्झिद हसनने 27 डावात 775, आणि पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने 26 डावात 771 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने पाच सामन्यात 181 धावा केल्या तर तो या तिन्ही खेळाडूंना धोबीपछाड देईल. (फोटो- PTI)

अभिषेक शर्माने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत उत्तम फलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. त्याने सहा सामन्यात पंजाबकडून खेळताना 249.18 च्या स्ट्राईक रेटने 304 धावा केल्या आहेत. यात 27 चौकार आणि 26 षटकार मारले आहेत. (फोटो- PTI)