
आशिया कप स्पर्धेत अभिषेक शर्माने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत अभिषेक शर्माने सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याच्या या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली आहे. आयसीसीने त्याला गुड न्यूज दिली आहे. (Photo- PTI)

अभिषेक शर्माने 314 धावा केल्याबद्दल त्याला आशिया कप स्पर्धेत प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कारही मिळाला होता. आता आयसीसीकडून अभिषेक शर्माला सप्टेंबर महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार दिला जाणार आहे. (Photo- PTI)

आशिया कप 2025 स्पर्धेत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली. त्याने 44.85 च्या सरासरीने 314 धावा केल्या आणि तीन अर्धशतकेही झळकावली होती. ( Photo: Instagram)

आयसीसीच्या प्लेयर ऑफ द मंथच्या पुरस्कारांच्या शर्यतीत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव आणि झिम्बाब्वेचा सलामीवीर फलंदाज ब्रायन बेनेट हे देखील होते. पण या दोघांना मागे टाकत अभिषेक शर्माने पुरस्कार पटकावला आहे. कुलदीपने आशिया कपमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या. तर बेनेटने टी20 वर्ल्डकप पात्रता फेरीत शतक झळकावले होते. (फोटो-Francois Nel/Getty Images)

आयसीसीचा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिषेक शर्मा म्हणाला की, "हा पुरस्कार मिळाल्याने अभिमान वाटत आहे. महत्त्वाच्या सामन्यांमधील कामगिरीनंतर मला हा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची क्षमता असलेल्या संघाचा भाग असल्याचा मला आनंद आहे." (Photo- PTI)