ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माकडे विक्रम रचण्याची संधी, इतकं केलं की झालं

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका खिशात घालण्याची भारताकडे संधी आहे. तर भारताचा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्माकडे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा टप्पा गाठण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त 11 धावा कराव्या लागणार आहेत.

Updated on: Nov 07, 2025 | 5:41 PM
1 / 5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताकडे 2-1 ने आघाडी आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे शेवटच्या सामन्यात भारताकडे मालिका विजयाची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियाला फार तर मालिका बरोबरीत सोडवू शकते. पाचव्या सामन्यात अभिषेक शर्माकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. (Photo- PTI)

2 / 5
भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा सध्या फॉर्मात आहेत मागच्या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याची बॅट धावांचा वर्षाव करत आहे. आता टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. (Photo- PTI)

3 / 5
अभिषेक शर्माकडे टी20 क्रिकेटमध्ये झटपट 1000 धावा करण्याची संधी आहे. या टप्पा गाठण्यासाठी फक्त 11 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाच्या टिम डेव्हिडच्या नावावर असलेला विक्रम तो आपल्या नावावर करेल. (Photo- PTI)

4 / 5
अभिषेक शर्मा जलद 1000 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरेल. कारण विराट कोहलीने 1000 धावांचा पल्ला 27 डावात पूर्ण केला होता. आता ही संधी अभिषेककडे 28 डावात पूर्ण करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी डावात 1000 धावा करण्याचा विक्रम डेव्हिड मलानच्या नावावर आहे. त्याने 24 डावात ही कामगिरी केली आहे. (Photo- PTI)

5 / 5
दुसरीकडे, टिम डेव्हिडने कमी चेंडूत 1000 धावांचा पल्ला गाठला आहे. त्याने 569 चेंडूत ही कामगिरी केली आहे. अभिषेकने 521 चेंडूत 989 धावा केल्या आहेत. अभिषेककडे टिम डेव्हिडला मागे टाकण्याची मोठी संधी आहे. (Photo- PTI)