
अफगाणिस्तान टीमने वर्ल्ड कप 2023 मध्ये इतिहास रचलाय. अफगाणिस्तानने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडला 69 धावांनी पराभूत केलंय.

अफगाणिस्तानचा वर्ल्ड कप इतिहासातील हा दुसराच विजय ठरलाय. अफगाणिस्तानने 8 वर्षांआधी वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवला होता.

अफगाणिस्तानने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये पहिलावहिला विजय मिळवला होता. अफगाणिस्तानने स्कॉटलँडवर विजय मिळवला होता.

अफगाणिस्तानने त्यानंतर आता 8 वर्षांनी यंदा 2023 मध्ये वर्ल्ड कपमध्ये 14 सामन्यात पराभूत झाल्यानंतर 15 व्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे.

अफगाणिस्ताने विजय मिळवल्याने अनेक खेळाडू हे भावूक झाले. अफगाणिस्तानला हा विजय कायम स्मरणात राहिल.