वेस्ट इंडिज झिम्बाब्वे सामन्यात मोडला षटकारांचा विक्रम, 12 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असं घडलं

T20 World Cup 2026: सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे सामना पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा 107 धावांनी धुव्वा उडवला. पण या सामन्यात षटकारांचा एक विक्रम रचला गेला. काय ते जाणून घ्या

| Updated on: Feb 24, 2026 | 3:48 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने झिम्ब्बाब्वेचा 107 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण झिम्ब्वाब्वेचा संघ 147 धावा करू शकला. यासह वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा +5.350 झाला आहे. (Photo_ PTI)

2 / 5
वेस्ट इंडिज झिम्बाब्वे सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास होता. या सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव झाला. दोन्ही संघांनी मिळून इतिहास रचला. वेस्ट इंडिज-झिम्बाब्वे दोन्ही संघांनी मिळून षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

3 / 5
वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे सामन्यात एकूण 31 षटकार मारले गेले. यासह टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. यापूर्वी हा विक्रम आयर्लंड आणि नेरलँडच्या नावावर होता.  (Photo- Windies Cricket Twitter)

4 / 5
2014 मध्ये आयर्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात झालेल्या सामन्यात 30 षटकार मारण्यात आले होते. आता 12 वर्षांनी हा विक्रम मोडीत काढला आहे. टी20 विश्वचषकाच्या एकाच सामन्यात 30 पेक्षा जास्त षटकार मारले गेले. (Photo- Windies Cricket Twitter)

5 / 5
वेस्ट इंडिजकडून या सामन्यात एकूण 19 षटकार मारले गेले. तर झिम्बाब्वेने या डावात एकूण 12 षटकार मारले, सामन्यात एकूण 31 षटकार मारले आणि एक नवा विश्वविक्रम रचला. (Photo- Windies Cricket Twitter)