
टीम इंडियासमोर न्यूझीलंडच आव्हान आहे. टीम इंडिया सुद्धा या आव्हानासाठी सज्ज आहे. न्यूझीलंड विरुद्ध या वनडे सीरीजला सुरुवात होण्याआधी एक चांगली बातमी आहे. भारतीय टीमच्या चार प्लेयर्सना चांगलं यश मिळालय. ICC वनडे रँकिंगमध्ये हे चार खेळाडू चमकतायत.

ICC ने वनडे प्लेयर्सची ताजी रँकिंग जारी केलीय. विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्ध 2 शतक झळकावण्याचा ताज्या रँकिंगमध्ये फायदा झालाय. त्याने चार स्थानांची झेप घेतली असून 8 व्या वरुन तो चौथ्या नंबरवर पोहोचलाय.

बॅट्समनमध्ये शुभमन गिलला सुद्धा फायदा झालाय. श्रीलंकेविरुद्ध एक शतक आणि एक अर्धशतक झळकवून तो सीरीजमधील सर्वाधिक धावा बनवणारा दुसरा फलंदाज आहे. ICC वनडे रँकिंगमध्ये त्याला या प्रदर्शनाचा फायदा झालाय. तो 26 व्या नंबरवर आलाय.

गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये मोहम्मद सिराजने नंबर वन होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केलीय. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये तो सर्वाधिक 9 विकेट घेणारा गोलंदाज आहे. ट्रेंट बोल्ट आणि जॉस हेजलवुड आता तिसऱ्या स्थानावर आहेत.

सिराजशिवाय ICC वनडे रँकिंगमध्ये कुलदीप यादवने 4 स्थानांची झेप घेतलीय. पाच स्थानांची सुधारणा होऊन कुलदीप गोलंदाजांमध्ये 21 व्या स्थानावर आहे.