संजू सॅमसन लवकरच पदार्पण करणार! या आशेसह त्याच्या पाठीशी उभा राहिला भारतीय खेळाडू

Ajinkya Rahane- Sanju Samson: संजू सॅमसनला झिम्बाब्वे दौऱ्यातून वगळल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. संजू सॅमसनला तडकाफडकी डावलल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे त्याच्या पाठीशी उभा राहिला आहे. संजू सॅमसन लवकरच परतेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

| Updated on: Jul 07, 2026 | 3:55 PM
1 / 5
संजू सॅमसनला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघात निवडलं आहे. पण झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याचं नाव वगळण्यात आलं आहे. संजू सॅमसनला आराम दिल्याचं बोललं जात आहे. पण  त्याला डावललं असल्याचा आरोप अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे. (Photo: PTI)

2 / 5
भारताच्या टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या विजयात संजू सॅमसनचा मोलाचा हातभार राहिला आहे. त्यामुळे संजू सॅमसनला ड्रॉप केल्याने खळबळ उडाली आहे. या कारणास्तव बीसीसीआय आणि निवड समितीवर टीकेची झोड उठली आहे. त्यात संजू सॅमसनला बाहेर करण्याचं ठोस कारण समोर आलेलं नाही. (Photo: PTI)

3 / 5
झिम्बाब्वे दौऱ्यातून संजू सॅमसनला डावललं गेलं. पण त्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या टी20 सामन्याच्या प्लेइंग 11 मधून डावललं होतं. त्यावरून आर अश्विनने बीसीसीआयवर निशाणा साधला होता. आता अजिंक्य रहाणे देखील संजू सॅमसनच्या समर्थनार्थ उतरला आहे. (Photo: PTI)

4 / 5
अजिंक्य रहाणेने इंस्टा स्टोरीमध्ये संजू सॅमसनच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. संजू सॅमसनचं संघात लवकरच पुनरागमन होईल अशी आशा व्यक्त केली आहे.(Photo: PTI)

5 / 5
अजिंक्य रहाणेने लिहिलं की, आशा करतो की सॅमसनसोबत जे काही झालं त्याबाबत मॅनेजमेंटने त्याच्याशी चर्चा केली असेल. जरा विचित्र वाटतं की टी20 वर्ल्डकपचा हिरो असलेला खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर आहे. मला आशा आहे की तो लवकरच संघात परतेल. (Photo: PTI)

Follow Us