
भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे होत आहे. या सामन्यासाठी शुबमन गिलने संघात तीन बदल केले आहेत. यात अंशुल कंबोजने कसोटीत पदार्पण केलं आहे. वेगवान गोलंदाज काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. (Photo-BCCI Twitter)

अंशुल कंबोज हा भारतासाठी कसोटी खेळणारा 318 वा खेळाडू आहे. माजी क्रिकेटपटू विकेटकीपर फलंदाज दीप दासगुप्ता यांनी त्याला कसोटी कॅप सोपवली. टीम इंडियाने अचानक अंशुल कंबोजला का घेतलं? काय आहे खासियत जाणून घ्या.(Photo-BCCI Twitter)

अंशुल कंबोज हा 24 वर्षांचा असून वेगवान गोलंदाज आहे. अचूक गोलंदाजीमुळे त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवला आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याचा मॅकग्रा असं टोपण नाव पडलं आहे. अंशुल एकाच टप्प्यावर सतत गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. अंशुलची उंची 6 फूट 2 इंच आहे, त्यामुळे त्याला स्विंगसोबत अतिरिक्त बाउन्सही मिळतो. (Photo- PTI)

अंशुल कंबोजने 2022 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपली ताकद दाखवली आणि या गोलंदाजाने 10 सामन्यात 17 बळी घेतले. या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 2024 आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली. ( Photo: Getty Images)

अंशुल कंबोजने केरळविरुद्धच्या एका डावात 10 बळी घेत खळबळ उडवून दिली होती. अनिल कुंबळेनंतर हा पराक्रम करणारा तो फक्त दुसरा भारतीय आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरला. (Photo- PTI)

अंशुल कंबोजने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये 24 सामन्यांमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए मध्ये त्याच्याकडे 40 विकेट्स आहेत. टी20 मध्ये त्याच्याकडे 34 विकेट्स आहेत. अंशुल कंबोजला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याने इंडिया अ संघाकडून इंग्लंड लायन्स विरुद्ध दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आणि पाच विकेट्स घेतल्या. (Photo- Instagram)