Archery World Cup Stage 2: प्रशिक्षकाशिवाय जिंकलं सुवर्णपदक, दीपिका कुमारीचा अनुभव आला कामी

भारतीय महिला तिरंदाजी संघाने तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावले. भारताने शूट-ऑफमध्ये चीनचा पराभव केला. दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांनी महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात सुवर्ण कामगिरी केली.

| Updated on: May 10, 2026 | 5:50 PM
1 / 5
भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात एका रोमांचक शूट-आऊटमध्ये चीनला 5-4 (28-26) ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. एका रोमांचक अंतिम सामन्यात भारताने पहिला सेट जिंकला होता. पण चीनने जोरदार पुनरागमन करत सामना बरोबरीत आणला. निर्धारित चार सेट्सनंतरही गुणसंख्या बरोबरीत राहिल्याने शूट-ऑफ खेळावा लागला. (Photo: PTI)

2 / 5

शांघाय येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांनी महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 2021 नंतर या प्रकारात भारतीय महिला संघाचे हे पहिले सुवर्णपदक आहे. (Photo: PTI)

3 / 5

विश्वचषकातील रिकर्व्ह प्रकारात भारतीय महिला तिरंदाजी संघाने मिळवलेले सुवर्णपदक महत्त्वपूर्ण आहे. कारण त्यांनी हे यश पूर्णवेळ राष्ट्रीय प्रशिक्षकाशिवाय मिळवले आहे. प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत दीपिका कुमारीचा अनुभव कामी आला. दोन्ही तरुण सहकाऱ्यांना तिने मार्गदर्शन केले. (Photo: PTI)

4 / 5

शूट-ऑफमध्ये चार सेट्सनंतर स्कोअर 4-4 असा बरोबर होता. मात्र, दबावाखाली भारताने पाचवा सेट जिंकून चीनला पराभूत केले आणि सुवर्णपदक पटकावले. (Photo: PTI)

5 / 5

विशेष म्हणजे उपांत्य फेरीत भारताच्या दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड या त्रिकुटाने 10 वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केला. कोणत्याही स्तरावरील महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात भारताचे तीन वर्षांतील हे पहिले सुवर्णपदक आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us