Lionel Messi World Record: लियोनल मेस्सीने विश्वविक्रम रचला, फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत गोल विक्रम

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने एक मोठा विक्रम रचला आहे. फिफा वर्ल्डकप स्पर्धा सहाव्यांदा खेळताना त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चला जाणून घेऊयात काय केलं?

| Updated on: Jun 23, 2026 | 6:08 PM
1 / 5
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पहिल्या सामन्यात त्याने गोलची हॅटट्रीक नोंदवली होती. आता मेस्सीने ऑस्ट्रियाविरुद्ध गोल मारत फिफा वर्ल्डकप स्पर्धेत विक्रम केला आहे.  (PC-GETTY IMAGES)

2 / 5
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत 28 सामने खेळत मेस्सीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मेस्सीने या स्पर्धेत एकूण 18 गोल मारले असून जर्मनीचा दिग्गज फुटबॉलपटू मिरास्लोव क्लोसचा विक्रम मोडला. त्याने या स्पर्धेत एकूण 16 गोल मारले होते. त्यानंतर ब्राझीलच्या रोनाल्डोच्या नावावर 15 गोल आहे.  (PC-GETTY IMAGES)

3 / 5
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोल मारण्याच्या शर्यतीत मेस्सीसोबत फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे आहे. फ्रान्सने इराकला 3-0 ने हरवले, यात कर्णधार किलियन एम्बाप्पेने दोन गोल केले. या दोन गोलांसह एम्बाप्पेने जर्मनीच्यामिरास्लोव क्लोसचा 16  गोलांच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यामुळे मेस्सीच्या जवळ येण्याची आणि त्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.  (PC-GETTY IMAGES)

4 / 5
लियोनल मेस्सीने आपल्या फुटबॉल कारकि‍र्दीत फिफा वर्ल्डकप जिंकला आहे. तसेच या स्पर्धेत सर्वाधिक गोल मारणारा खेळाडू ठरला आहे. या शिवाय सर्वाधिक बॅलन डी ऑर पुरस्कार जिंकण्याचा मान मिळवला आहे.  (PC-GETTY IMAGES)

5 / 5
ऑस्ट्रियाविरुद्ध मेस्सीने एक पेनल्टी मिस केली. त्यामुळे त्याच्या नााववर एक नकोसा विक्रमही रचला गेला आहे. सलग तीन वर्ल्डकप स्पर्धेत पेनल्टी मिस करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.  (PC-GETTY IMAGES)

Follow Us