
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा पार पडला. निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो- Arjun Tendulkar Instagram)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी घाम गाळत आहे. तर सानियाने स्वतःचा मार्ग स्वतःसाठी तयार केला आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची पदवीधर असलेली मिस्टर पॉजची संस्थापक आहे. (फोटो- ट्वीटर)

सानिया चांडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी ही मुंबईतील मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीमध्ये नियुक्त भागीदार आणि संचालक आहे.(फोटो- ट्वीटर)

अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याबद्दल बातम्या वेगाने सोशल मीडियावर पसरल्या आहेत. पण दोन्ही कुटुंबांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे अधिकृत अशी माहिती नाही. पण सोशल मीडियावर अचानक वादळ उठल्याने यात काही तथ्य असण्यास वाव आहे. (फोटो- Arjun Tendulkar Instagram)

अर्जुन आणि सानिया कधी लग्न करणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या साखरपुड्याचा कोणताही फोटो अद्याप शेअर केलेला नाही.(फोटो- Arjun Tendulkar Instagram)