कर्णधार रोहित शर्माच्या रडारवड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड, वाचा काय ते

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. बांग्लादेश आणि पाकिस्तानला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे, रोहित शर्माच्या रडारवर सचिन तेंडुलकरचा विक्रम असणार आहे.

| Updated on: Mar 01, 2025 | 6:24 PM
1 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताचा शेवटचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. 2 मार्चला होणारा हा सामना औपचारिक असणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला एक विक्रम रचण्याची संधी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडता येईल.

2 / 5
रोहित शर्माकडे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वनडे क्रिकेटमध्ये एक विक्रम करण्याची संधी आहे. सध्या कर्णधार म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

3 / 5
रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 68 धावा केल्या तर सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला विक्रम मोडेल. सचिन तेंडुलकरने 73 वनडे सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. त्यात 37.75 च्या सरासरीने 2454 धावा केल्या आहेत. यात 6 शतकं आणि 12 अर्धशतकं ठोकली आहेत.

4 / 5
रोहित शर्माने 53 वनडे सामन्यात 53.04 च्या सरासरीने 113.50 च्या स्ट्राईक रेटने 2387 धावा केल्या आहेत. यात रोहित शर्माने 5 शतकं आणि 16 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे.

5 / 5
महेंद्रसिंह धोनी या यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्याने 6641 धावा, विराट कोहलीने 5449 धावा, मोहम्मद अझहरूद्दीनने 5239 धावा, सौरव गांगुलीने 5082, राहुल द्रविडने 2658 धावा केल्या आहेत. त्यानंतर सचिन आणि रोहितचा क्रमांक लागतो.