
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्णय 384 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाअखेर 7 विकेट गमावून 518 धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या डावात 134 धावांची आघाडी घेतली आहे.स्टीव्ह स्मिथने या सामन्यात 37 वे शतक झळकावले. या शतकासह स्मिथने अॅशेस मालिकेतील एक खास टप्पा ओलांडला आहे. (Photo- ICC Twitter)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सुरुवातीपासूनच आपल्या कलात्मक फलंदाजीने लक्ष वेधून घेणाऱ्या स्मिथने 166 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शतकासह एशेज मालिकेच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (Photo- ICC Twitter)

ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानावर आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 63 डाव खेळणारे डॉन ब्रॅडमन यांनी एकूण 19 शतके झळकावली. आता, स्टीव्ह स्मिथ 73 डावांमध्ये 13 शतकांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (Photo- ICC Twitter)

स्टीव्ह स्मिथ एशेज मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाजही बनला. याआधी इंग्लंडचा फलंदाज जॅक हॉब्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. इंग्लंडसाठी 41 अॅशेस कसोटी सामने खेळणाऱ्या जॅक हॉब्सने 71 डावांमध्ये 12 शतकांसह एकूण 3636 धावा केल्या. (Photo- ICC Twitter)

स्टीव्ह स्मिथने आता जॅक हॉब्सला मागे टाकत एशेजमध्ये 73 डावांमध्ये 3660* धावा केल्या आहेत. एशेज कसोटी मालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.डॉन ब्रॅडमन (5028) नंतर एशेज मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. (Photo- ICC Twitter)