
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत आणि एकतर्फी असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने यासह भारताची ह 438 दिवसांपासूनची बादशाहत संपवली. तसेच शुबमन एकदिवसीय कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयी करण्यात अपयशी ठरला. (Phot Credit : Getty)

उभयसंघातील सामना पर्थमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील पहिल्या डावात पावसाने 5 वेळा व्यत्यय आणला. त्यामुळे सामना 26 ओव्हरचा करण्यात आला. (Photo Credit : Getty)

टीम इंडियाने 26 ओव्हरमध्ये 9 विकेट्सच्या मोबदल्यात 136 धावांपर्यंत मजल मारली. मात्र ऑस्ट्रेलियाला विजयासाठी डीएलएसनुसार 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं आणि मालिकेत विजयी सलामी दिली. (Photo Credit : Getty)

ऑस्ट्रेलियाने भारताची या पराभवासह बादशाहत संपली. टीम इंडियाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 437 दिवसांनंतर पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने याआधी 4 ऑगस्ट 2024 रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना गमावला होता. (Photo Credit : Getty)

टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर सलग 8 एकदिवसीय सामने जिंकले होते. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिजमधील 3 सामने जिंकले होते. तर चॅम्पियन्स ट्रॉफीत 5 असे एकूण 8 सामने सलग जिंकले. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा विजयरथ यशस्वीरित्या रोखला. (Photo Credit : Getty)