
आयपीएल मेगा लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकूण 1574 खेळाडू लिलावात उतरले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला आरसीबीने रिलीज केलं आहे. त्यामुळे त्याच्यावर मेगा ऑक्शनमध्ये बोली लागणार आहे.

पावसामुळे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 7-7 षटकांचा केला होता. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि फिल्डिंग घेतली. मग काय दोन विकेट झटपट बाद झाल्यानंतर मैदानात ग्लेन मॅक्सवेल नावाचं वादळ घोंगावलं.

ग्लेन मॅक्सवेलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं होतं. तेव्हा त्याने 19 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 226.32 इतका होता.

पाकिस्तानविरुद्ध त्याने आक्रमक खेळी करत टी20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. टी20 हा पल्ला गाठणारा ग्लेन मॅक्सवेल 16 वा फलंदाज आहे. तर ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज आहे. डेविड वॉर्नरने 12411, तर एरोन फिंचने 11458 धावा केल्या आहेत.

दरम्यान, आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला रिलीज केलं असलं तरी आरटीएम कार्ड वापरू शकते. त्यामुळे त्याच्यावर किती बोली लागते यावर सर्वस्वी अवलंबून आहे. जर कमी बोली लागली तर आरटीएमच्या माध्यमातून आरसीबी पुन्हा घेऊ शकते.