
ऑस्ट्रेलियाची लेग स्पिनर अलाना किंग हीने इतिहास घडवला आहे. अलानाने बुधवारी 8 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चाबूक अर्धशतक झळकावलं. अलानाने 49 बॉलमध्ये 51 रन्स केल्या. (Photo Credit : PTI)

अलान किंगने केलेलं हे अर्धशतक ऐतिहासिक ठरलं. अलाना दहाव्या स्थानी येऊन अर्धशतक करणारी पहिलीवहिली महिला फलंदाज ठरली. अलानाने या अर्धशतकी खेळीत 3 षटकार आणि 3 चौकार लगावले. अलानाने 104.08 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. (Photo Credit : PTI)

अलानाच्या या अर्धशतकी खेळीमुळे वर्ल्ड रेकॉर्डही ब्रेक झाला. अलाना आणि बेथ मूनी या जोडीने नवव्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली. यासह महिला क्रिकेटच्या इतिहासात नवव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. (Photo Credit : PTI)

बेथ मूनी आणि अलाना किंग या जोडीने केलेल्या शतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरमध्ये 221 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाची 7 आऊट 76 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर या जोडीने निर्णायक भागीदारी करत कांगारुंना सावरलं. (Photo Credit : PTI)

अलानाचं भारतासह खास कनेक्शन आहे. अलानाची आई चेन्नईच्या रहिवाशी होत्या. मात्र त्यांनतर त्या 1989 साली मेलबर्नमध्ये स्थायिक झाल्या. तिथेच अलानाचा जन्म झाला.(Photo Credit : PTI)