
1975 साली ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा वेस्ट इंडिजने 17 धावांनी पराभूत केलं होतं. वेस्ट इंडिजने 291 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने 274 धावा केल्या आणि 17 धावांनी पराभव झाला.

1987 मध्ये ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडचा संघ 246 धावा करू शकला आणि ऑस्ट्रेलियाने 7 धावांनी विजय मिळवला.

1996 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात अंतिम फेरीचा सामना झाला. हा सामना श्रीलंकेने 7 गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने विजयसाठी 241 धावांचं आव्हान दिलं होतं. पण श्रीलंकेनं 7 गडी राखून विजय मिळवला.

1999 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 8 गडी राखून जिंकला. पाकिस्तानने 132 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमवून हे आव्हान गाठलं.

2003 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने आले होते. हा सामना ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने 360 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारत सर्वबाद 234 धावा करू शकला.

2007 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर 281 धावांचं आव्हान ठेवलं. पण श्रीलंकन संघ 215 धावा करू शकला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 53 धावांनी जिंकला.

2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात लढत झाली. अंतिम फेरीत न्यूझीलंडने 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 7 गडी राखून पराभूत केलं.

2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. हा सामना कोण जिंकतं याची उत्सुकता आहे.