
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. अशात क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू आयुष्यातील नव्या इनिंगसाठी सज्ज आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर मार्कस स्टोयनिस याने त्याची गर्लफ्रेंड Sarah Czarnuch सह साखरपूडा केला आहे. मात्र दोघांच्या लग्नाची तारीख अजून समजू शकलेली नाही. (Photo Credit : Instagram)

ऑलराउंडर मार्कस स्टोयनिसची होणारी बायको ही मॉडेल आहे. सारा ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशातील ब्रँडसाठी काम करते. तसेच सारा बिजनेसवूमन आहे. सारा फॅशन इंडस्ट्रीत फार सक्रीय आहे. (Photo Credit : Instagram)

सारा मॉडलिंग व्यतिरिक्त फॅशनबाबतल लिखाणही करते. सारा फॅशन मॅगजीनमध्ये स्किन केअर, फॅशन ट्रेंड्स आणि लाईफस्टाईल या विषयांवर लिखाण करते. (Photo Credit : Instagram)

स्टोयनिस ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर आहे. स्टोयनिसने ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत विजय मिळवून देण्यात बॅटिंग आणि बॉलिंगने निर्णायक भूमिका बजावली आहे. स्टोयनिस आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त आयपीएल, बीबीएल आणि अन्य लीग स्पर्धेतही खेळतो. (Photo Credit : Instagram)

मार्कस स्टोयनिस याने काहीच महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. स्टोयनिसने ऑस्ट्रेलियाचं 71 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. तर स्टोनिस आतापर्यंत 74 टी 20i सामने खेळला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टोयनिसचं नेटवर्थ हे 40 कोटी रुपयांपर्यंत आहे. तसेच स्टोयनिस आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचं प्रतिनिधित्व करतो. स्टोयनिसला आयपीएलच्या एका हंगामात खेळण्यासाठी 11 कोटी रुपये मिळतात. (Photo Credit : Instagram)