BAN vs PAK: पाकिस्तानच्या गोलंदाजाची नकोशी कामगिरी, क्रीडाप्रेमींनी 26 वर्षानंतर असा दिवस पाहिला
पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा फिरकीपटू नौमान अलीने सुमार गोलंदाजीचं दर्शन घडवलं. यामुळे संघाला पहिल्याच दिवशी फटका बसला आहे. तसेच नौमान अलीच्या नावावर एक नकोसा विक्रम रचला गेला आहे.

पाकिस्तान आणि बांगालदेश यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी डावखुरा फिरकीपटू नौमान अलीने नकोशी कामगिरी केली. त्याने पहिल्या दिवशी एक विकेट घेतला. पण गोलंदाजीत सुमार कामगिरी केली. (Photo: PTI)

नौमान अलीने ढाकामध्ये खेळत असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एक दोन नाही तर 6 नो बॉल टाकले. त्याच्या एक नो बॉलवर विकेट मिळाली आणि वायाही गेली. (Photo: PTI)

नौमान अली एक दिवसात सहा नो बॉल टाकणारा दुसरा पाकिस्तानी फिरकीपटू आहे. वर्ष 2000 मध्ये पहिल्यांदा कसोटी असं घडलं होतं. त्यावेळी फिरकीपटूने एका दिवशी सहा नो बॉल टाकले होते. (Photo: PTI)

पाकिस्तानसाठी मागच्या एका वर्षात सर्वाधिक नो बॉल टाकण्यात नौमान अली आघाडीवर आहे. नौमान अलीने एका वर्षात 15 नो बॉल टाकले आहेत. काशिफ अलीने 5 नो बॉल टाकले. तर इतर गोलंदाजांनी एकूण 7 नो बॉल टाकले. (Photo: PTI)

बांगलादेशने कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 4 गडी गमवून 301 धावा केल्या आहेत. यात नजमुल हसन शांतोने 130 चेंडूत 101 धावा, तर मोमिनुल हकने 91 धावांची खेळी केली. तर मुश्तफिकुर रहीम नाबाद 48 धावांवर राहिला. (Photo: PTI)