IND vs NZ: भारत न्यूझीलंड टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने बॅट तोडल्या, कारण की…

IND vs NZ T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. असं असताना ही मालिका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

| Updated on: Jan 22, 2026 | 3:37 PM
1 / 5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. भारताने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. पहिल्या सामन्यात 238 धावांचं आव्हान दिलं आणि न्यूझीलंडला 190 धावांवर रोखलं. हा सामना भारताने 48 धावांनी जिंकला. (Photo- PTI)

2 / 5
भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील ट्रॉफीची चर्चा जोरात सुरू आहे. त्याला कारणही तसंच आहे. ट्रॉफी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे काय तरी वेगळंच मटेरियल आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही ट्रॉफी बॅट आणि बॉलपासून तयार केली आहे. (Photo- PTI)

3 / 5
भारत न्यूझीलंड मालिकेतील विजयी संघाला मेटल नाही तर बॅट-बॉलपासून तयार केलेली ट्रॉफी मिळेल. बॅट बॉल रिसायकल करून ही ट्रॉफी तयार केली आहे. (Photo- PTI)

4 / 5
बीसीसीआयने या मालिकेसाठी जुन्या बॅट कापून ट्रॉफी तयार केली आहे. यासह चेंडूसाठी वापरलं जाणारं चामडंही समाविष्ट केलं आहे. ट्रॉफीला हलका ब्राऊन आणि मरून रंग दिला आहे. (Photo- PTI)

5 / 5
टी20 मालिकेतील ट्रॉफीसा हलका ब्राऊन बॅटमुळे, तर मरून रंग चेंडूचं प्रतिक आहे. या ट्रॉफीची चर्चा रंगली आहे. आता ही ट्रॉफी कोणाला मिळते? याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Photo- PTI)