
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एशेज 2025-2026 कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थवर सुरु असून पहिल्याच दिवशी 19 विकेट पडल्या. यामुळे गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. यात कर्णधार बेन स्टोक्सने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. (Photo- PTI)

इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फक्त 172 धावा करून ऑलआऊट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची पकड असेल असं वाटलं होतं. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमबॅक करून दिलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 123 धावांवर 9 गडी गमावले. (Photo- PTI)

इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वात भेदक गोलंदाजी केली. त्याच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हतबल दिसले. त्याने 6 षटकात 23 धावा देत 5 गडी बाद केले. त्याने 11 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात खेळलेल्या कसोटी सामन्यात पाच विकेट घेण्याची किमया केली. (Photo- PTI)

बेन स्टोक्सने 5 विकेट घेताच इंग्लंड क्रिकेट इतिहासात आपल्या विक्रमाची नोंद केली आहे. 1982 मध्ये बॉब विलिसने गाबामध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर बेन स्टोक्सने पाच विकेट घेणारा इंग्लंडचा पहिला कर्णधार आहे. म्हणजेच 43 वर्षानंतर असा विक्रम घडला. (Photo- PTI)

एशेज कसोटी इतिहासात कर्मधाराने शतकासह 5 विकेट घेण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी बेन स्टोक्सने एशेज मालिकेत शतकी खेळी केली आहे. पण पाच विकेट घेतल्या नव्हत्या. बेन स्टोक्सह माँटी नोबल आणि स्टेनली जॅक्सनने अशी कामगिरी केली आहे. (Photo- PTI)