
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची कामगिरी भारताविरुद्ध फलंदाजीत तर काही खास राहिली नाही. लीड्स कसोटीतही त्याची कामगिरी निराशाजनक होती. आता एजबेस्टन कसोटीतही असंच चित्र पाहायला मिळाल. खरं तर हा कसोटी सामना त्याच्या कसोटीतील वाईट दिवस होता. (Photo: PTI)

एजबेस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात इंग्लंडचे चार विकेट पडले तेव्हा बेन स्टोक्स फलंदाजीला आहे. पण फार काळ तग धरू शकला नाही. मोहम्मद सिराजने त्याला बाउंसर टाकला आणि पहिल्याच चेंडूवर तंबूत पाठवलं. (Photo: Getty Images)

बेन स्टोक्स पहिल्याच चेंडूवर बाद होत गोल्डन डकचा शिकार ठरला. त्याला खातंही खोलता आलं नाही. यासोबत 13 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीवर गोल्डन डकचा डाग लागला. (Photo: Getty Images)

इंग्लंडकडून सहा वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार गोल्डन डकवर बाद झाला आहे. यापूर्वी 21098 मध्ये मॅन्चेस्टर कसोटीत जो रूट शून्यावर बाद झाला होता. एजबेस्टनमध्ये रूट बाद झाल्यानंतर स्टोक्स फलंदाजीला उतरला होता. (Photo: Getty Images)

भारताविरुद्ध स्टोक्स दुसऱ्यांदा कर्णधार म्हणून शून्यावर बाद झाला. मागच्या वर्षी स्टोक्स धर्मशाळेत कसोटी खेळताना खातं न खोलता बाद झाला होता. (Photo: PTI)