Vision 2028: भाजपा आमदाराकडे या संघाचं गोलंदाजी प्रशिक्षकपद! युवा खेळाडूंना देणार मार्गदर्शन

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवलं आणि सत्ता स्थापन केली. भाजपाच्या तिकीटावर भारताचा माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा देखील निवडून आला. आता त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

| Updated on: Jun 25, 2026 | 6:31 PM
1 / 5
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि बंगालचा दिग्गज वेगवान गोलंदाज अशोक डिंडा आता बंगाल संघाला गोलंदाजीचे धडे देणार आहे. अशोक डिंडा नुकतीच भाजपाच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवली होती. (PC-GETTY IMAGES)

2 / 5
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने बुधवारी वीजन 2028 कार्यक्रमांतर्गत बंगालच्या दोन महान क्रिकेटपटूंना आपल्या साथीला घेतलं. उत्पल चटर्जी आणि अशोक डिंडा हे दोघं आता कोचिंग स्टाफचा भाग असतील. सीएबीने घोषणा करत सांगितलं की, अशोक डिंडा वेगवान गोलंदाजी, तर उत्पल चटर्जी फिरकी गोलंदाजीला कोचिंग देतील. (PC-GETTY IMAGES)

3 / 5
अशोक डिंडाकडे फक्त गोलंदाज प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिलेली नाही तर विजन 2028 चं प्रमुखपदही दिलं आहे. बंगाल क्रिकेट या प्रोजेक्ट अंतर्गत युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत पुढे जाण्यास सहकार्य करणार आहे. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
अशोक डिंडाने पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील मोयना विधानसभा जागेवरून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली. त्यानंतर त्याच्याकडे राज्यमंत्रिपद आहे. (PC-GETTY IMAGES)

5 / 5
अशोक डिंडाने भारतासाठी 13 वनडे सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. त्याने 9 टी20 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. तर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये डिंडाच्या नावावर 722 विकेट आहेत. (PC-GETTY IMAGES)

Follow Us