
केकेआरचे स्टार फलंदाज नितीश राणाचं नाव आज क्रिकेट विश्वात खूप मोठं आहे. राणा हा मधल्या फळीचा मजबूत फलंदाज आहे. राणा आपल्या खेळासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असतो. त्याची पत्नी सांची मारवाहही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. चला तिचे काही सुंदर फोटो पाहूयात.

कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा आणि त्याची पत्नी सांची मारवाह यांची जोडी खूप सुंदर दिसते.

नितीश राणाची पत्नी सांची मारवाह व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे आणि तिची जोडी नितीशसोबत खूप सुंदर दिसते. नितीश आणि सांची यांचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता.

नितीश त्याच्या खेळामुळे खूप प्रसिद्ध आहे, पण त्याची पत्नी सांची मारवाह बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सांचीची कारकीर्द 2015 मध्ये सुरू झाली.

सांची मारवाहने सुशांत स्कूल ऑफ डिझाईन, अंसल युनिव्हर्सिटीच्या विद्याशाखेतून शिक्षण घेतलं आहे. सांचीने अनेक नामवंत इंटीरियर डिझायनर्सकडून प्रशिक्षणही घेतलं आहे. या जोडप्याने एका मुलाखतीत असंही सांगितलं की अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरुन दोघांमध्ये भांडण होत होते. नितीश राणा म्हणाला की आमच्या खोलीत एक लहान उशी आहे, सांची आणि मी अनेकदा त्या उशावरून भांडतो की दोघांपैकी कोण त्या उशीवर झोपेल.