भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यासाठी असं तिकीट बुक करा, जाणून घ्या

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्यानंतर मायदेशी परतेल आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळेल. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याची तिकीट विक्री सुरु झाली आहे. तिकीटाचे दर परवडणारे असून तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येतील.

| Updated on: Oct 20, 2025 | 11:14 PM
1 / 5
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे आणि टी20 मालिका संपली की लगेच भारतीय क्रीडाप्रेमींना कसोटी क्रिकेटची मेजवानी मिळमार आहे. भारताची गतविजेत्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण अफ्रिकेशी लढत होणार आहे. सहा वर्षांनी कसोटी क्रिकेटचे मैदानावर पुनरागमन होत आहे. दोन सामन्यांची ही मालिका असून पहिल्या सामन्याची तिकीट विक्री सुरु झाली आहे.(PHOTO- BCCI Twitter)

2 / 5
14 नोव्हेंबर रोजी कोलकात्यातली ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. या सामन्याची तिकीट विक्री सुरु झाली आहे. विशेष म्हणजे तिकिटाची किंमत 60 रुपयांपासून सुरू होते. (PHOTO- BCCI Twitter)

3 / 5
सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी टीम इंडियाच्या आगामी कसोटी सामन्याशी संबंधित हा निर्णय घेतला आहे. सामन्याची तिकिटे डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो एपवर बुक करता येतील. (PHOTO- BCCI Twitter)

4 / 5
एका दिवसाचे तिकीट फक्त 60 रुपये असणार आहे. म्हणजे पाच दिवसांसाठी फक्त 300 रुपये मोजावे लागतील. तर प्रीमीयम गॅलरी तिकिटे 250 रुपयांना विकली जात आहे. म्हणजेच पाच दिवसांसाठी 1250 रुपये असतील. (PHOTO- BCCI Twitter)

5 / 5
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर, तर दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीत खेळला जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारताला दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. (PHOTO- BCCI Twitter)