
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरोधात वनडे इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर केला आहे. 50 षटकात 5 गडी गमवून 399 धावा केल्या. यापूर्वी टीम इंडियाने 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात 6 गडी गमवून 383 धावा केल्या होत्या.

भारताकडून शुबमन गिल 104, श्रेयस अय्यर 105, केएल राहुल 52 आणि सूर्यकुमार यादव याने 72 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव याने 37 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 72 धावा ठोकल्या.

ऑस्ट्रेलियाकडून कॅमरोन ग्रीन याने सर्वात महागडं षटक टाकलं. त्याने 10 षटक 10330 च्या इकोनॉमीन 103 धावा दिल्या. तसेच दोन गडी बाद केले.

कॅमरोन ग्रीन याच्या एका षटकात तर 26 धावा ठोकल्या. सूर्यकुमार यादव याने पहिल्या चार चेंडूवर चार षटकार ठोकले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी एक एक धाव घेतली.

सीन अॅबटने 10 षटकात 91 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. जोश हेझलवूडने 62, स्पेंसर जॉनसनने 61 धावा दिल्या, अॅडम जम्पा याने 10 षटकात 67 धावा दिल्या.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध चमकदार कामगिरी करत टीम इंडियाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वनडे फॉर्मेटमध्ये टीम इंडियाने 3000 षटकार पूर्ण केले आहेत. यापूर्वी ही किमया कोणत्याच संघाने केलेली नाही.