वेस्ट इंडिज दौऱ्यात कर्णधार रोहित शर्मा खेळणार नाही? कर्णधारपदाची माळ या खेळाडूच्या गळ्यात पडणार!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी खेळले जाणार आहेत. तर 27 जुलैपासून 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 3 ऑगस्टपासून 5 सामन्यांची टी 20 मालिका सुरु होणार आहे.

| Updated on: Jun 17, 2023 | 10:11 PM
1 / 7
India vs West Indies: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेत खेळणार नसल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

India vs West Indies: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेत खेळणार नसल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

2 / 7

आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर रोहित शर्मा हॉलिडे मूडमध्ये आहे. त्यामुळे आगामी सीरिजमध्ये विश्रांती घेण्याची इच्छा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही अशी चर्चा रंगली आहे.

3 / 7

रोहित शर्मा बाहेर पडल्यास निवड समितीला पुन्हा कर्णधाराची निवड करावी लागेल. त्यामुळे कर्णधारपदाची माळ पुन्हा एकदा विराट कोहलीच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. असं असलं तरी निवड समितीने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

4 / 7

वेस्ट इंडिज मालिकेत टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे. रोहित शर्मा येथे टी-20 मालिकेत दिसणार नाही हे निश्चित आहे.

5 / 7

आगामी विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला एक मजबूत वनडे संघ तयार करायचा आहे. दरम्यान, रोहित शर्माची विश्रांतीची विनंती निवड समितीसाठी नवी डोकेदुखी ठरली आहे.

6 / 7

वृत्तानुसार, निवड समिती 26 जून रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यापूर्वी रोहित शर्माशी चर्चा करेल. रोहित शर्मा अखेर वेस्ट इंडिज मालिकेत खेळणार की निवड समिती त्याला विश्रांती देणार हे २७ जूनला स्पष्ट होईल.

7 / 7

सलग 2 महिने आयपीएलमध्ये खेळणारे स्टार खेळाडू टीम इंडियाच्या मालिकेदरम्यान विश्रांती घेत आहेत, ज्यामुळे आता एक नवीन चर्चा सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us