चॅम्पियन्स ट्रॉफीत अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानने रचला इतिहास, काय केलं वाचा

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानने इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 177 धावांची खेळी केली. त्याने वनडे क्रिकेट कारकिर्दितलं सहावं शतक ठोकलं. यासह त्याने विक्रमांची नोंद केली आहे.

| Updated on: Feb 26, 2025 | 6:34 PM
1 / 5
अफगाणिस्तानने इंग्लंडसमोर विजयासाठी 50 षटकात 326 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्तानचे 37 धावांवर 3 विकेट अशी स्थिती होती. त्यामुळे अफगाणिस्तानचं काही खरं नाही असंच वाटत होतं. पण इब्राहिम झाद्रानने डाव सावरला.

2 / 5
इब्राहिम झाद्रानने 106 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्यानंतर आक्रमक खेळी करत 146 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 177 धावा केल्या. कर्णधार शाहिदीसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

3 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासा इब्राहिम झाद्रान सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडच्या बेन डकेटचा विक्रम मोडला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 165 धावांची खेळी केली होती.

4 / 5
झाद्रानने वनडे क्रिकेटमध्ये 150 पेक्षा जास्त धावा करण्याची दुसरी संधी आहे. यापूर्वी झाद्रानने श्रीलंकेविरुद्ध 2022 मध्ये 162 धावा केल्या होत्या. इतकंच काय तर चॅम्पियन्स ट्रॉफी शतक ठोकणारा पहिला अफगाणी फलंदाज ठरला आहे.

5 / 5
झाद्रानने 2019 मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. वनडेत सहा शतके आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत. झाद्रानने एकदिवसीय सामन्यात 5 शतके ठोकणाऱ्या रहमत शाहला मागे टाकले.