
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने पराभवाचं पाणी पाजलं. पण या सामन्यात बाबर आझमने एक नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे.

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 321 धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानकडून बाबर आझम आणि सउद शकील ही जोडी मैदानात होती. सउद फक्त 6 धावा करून बाद झाला. तर बाबर आझम संथ गतीने एका बाजूने खिंड लढवत होता.

बाबर आझमने अर्धशतक करण्यासाठी 81 चेंडूंचा सामना केला. यामुळे बाबर आझमच्या नावावर एका वाईट विक्रमाची नोंद झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासात सर्वात संधी गतीने अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

पाकिस्तानचा माजी सलामीवीर नासेर जमशेदने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 83 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. खराब फलंदाजीनंतर बाबर आझम आता या नकोशा विक्रमांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

या सामन्यात 90 चेडूंचा सामना करणाऱ्या बाबर आझमने फक्त 64 केल्या. पाकिस्तानचा संघ 47.2 षटकांत 260 धावांवर आटोपला. दरम्यान, पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 60धावांनी मोठा विजय मिळवला.