आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये करणार बदल, प्रत्येक सामना जिंकल्यावर आता गुण मिळणार नाहीत, तर…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीची वार्षिक बैठक बुधवारी होणार आहे. या बैठकीत वनडे क्रिकेटपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत मोठे बदल करण्याबाबत यात चर्चा होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jul 06, 2026 | 5:49 PM
1 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चौथं पर्व सुरू असून अंतिम सामना जून 2027 मध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे.  दुसरीकडे टीम इंडियाचं गणित जर तर वर आहे. पण या स्पर्धेत कमी सामने खेळणाऱ्या संघांना फायदा होताना दिसत आहे. तर जास्त मालिका खेळणाऱ्या संघाच्या विजयी टक्केवारीत घट होते. त्यामुळे आयसीसीने गुणतालिकेत बदल करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. (फोटो-GETTY IMAGES)

2 / 5
आयसीसीच्या बैठकीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणातालिकेत बदल करण्याचा प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावानुसार कसोटी मालिकेतील आधारावर गुण मिळतील. म्हणजेच एखादा संघाने जास्त कसोटी मालिका जिंकल्या तर त्या आधारावर गुण ठरवले जातील. त्यामुळे एक सामना जिंकला किंवा हरला तरी काही फरक पडणार नाही. गुणतालिकेत बदल मालिका विजयावर होणार आहे. (फोटो-GETTY IMAGES)

3 / 5
न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका सारखे संघ कमी कसोटी सामन्यांच्या मालिका खेळतात. त्यामुळे त्यांना तुलनेनं कमी पराभवांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची विजयी टक्केवारी ही पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणाऱ्या संघांच्या तुलनेत अधिक असते. यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ सहभागी आहेत. (फोटो-GETTY IMAGES)

4 / 5
आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण बैठक बुधवारी होणार आहे. या बैठकीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 12 संघाबाबत चर्चा होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027-2029 मध्ये 12 संघ खेळण्याचा प्रस्ताव आहे. यात आयर्लंड, झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान या संघांना एन्ट्री देण्याचा विचार आहे. (फोटो-GETTY IMAGES)

5 / 5
दुसरीकडे, आयसीसीच्या बैठकीत वनडे क्रिकेटबाबत निर्णय घेतला जाणार आहे. वनडे सामन्यांची संख्या कमी कमी करण्यासाठी आणि चॅम्पियन लीगसारखी नवी वर्ल्ड टी20 स्पर्धा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. (फोटो-GETTY IMAGES)

Follow Us