AUS vs ENG : ट्रेव्हिस हेडने शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाचं 17 कोटींचं नुकसान केलं, झालं असं की…

इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून जिंकला. खरं तर या कसोटी सामन्यात इंग्लंडचं पारडं जड होतं. पण ट्रेव्हिस हेडच्या वादळी खेळीमुळे सर्वकाही वाहून गेलं. या खेळीने इंग्लंडलाच नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही फटका बसला आहे.

Updated on: Nov 24, 2025 | 6:25 PM
1 / 5
ऑस्ट्रेलिया इंग्लंड ही प्रतिष्ठित कसोटी मालिका गणली जाते. ही मालिका द्वंद्व आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींसाठी मोठी पर्वणी असते. असं असताना या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचं 17 कोटींचं नुकसान झालं आहे. (फोटो- ICC Twitter )

2 / 5
पर्थ कसोटी सामना पाच दिवसांचा असेल असा अंदाज बांधला जात होता. पण हा सामना दोन दिवसातच संपला. पहिल्या दिवशी पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 172 धावांवर बाद झाला. तर ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 9 गडी गमावले होते. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला आणि ऑस्ट्रेलियाचा शेवटचा गडी 132 धावा असताना बाद झाला. (फोटो- ICC Twitter )

3 / 5
इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला आणि 164 धावा करू शकला. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडी पकडून 204 धावा झाल्या आणि विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने 83  चेंडूत 123 धावा केल्या. या स्फोटक फलंदाजीच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने 28.2  षटकांत 205 धावा केल्या आणि दुसऱ्या दिवशीच सामना संपवला. (फोटो- England Cricket Twitter )

4 / 5
ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या 2 दिवसांत सामना संपवल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 3 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे म्हणजे जवळपास 17 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एबीसी स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, पहिला कसोटी सामना दोन दिवसांत संपल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या महसुलाला फटका बसला आहे. (फोटो- PTI )

5 / 5
रविवारी सामना पाहण्यासाठी 60 हजार लोकांनी तिकिटे बुक केली होती. परंतु ट्रेव्हिस हेडच्या आक्रमक खेळीमुळे पहिला कसोटी सामना दुसऱ्या दिवशीच संपला. त्यामुळे उर्वरित दिवसांची तिकिटे विक्रीही वाया गेली. या तिकिट विक्रीतून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुमारे 3 दशलक्ष डॉलर्स मिळण्याची अपेक्षा होती. (फोटो- PTI )