
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. पुण्याच्या अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाकडून त्याला मानद डॉक्टरेट ही पदवी दिली जाणार आहे. 24 जानेवारीला विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात त्याला हा सन्मान प्रदान केला जाईल. (PHOTO CREDIT- PTI)

रोहित शर्माच्या क्रिकेटमधील योगदानासाठी विद्यापीठाकडून हा सन्मान दिला जाणार आहे. विद्यापीठाने याबाबत घोषणा केली आहे. क्रिकेटविश्वात रोहित शर्मा हा हिटमॅनने प्रसिद्ध आहे. पण दीक्षांत समारंभानंतर त्याच्या नावाच्या वलयात आणखी पद जोडलं जाईल. (PHOTO CREDIT- PTI)

रोहित शर्मा भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आहे. त्याने कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून वनडे क्रिकेट खेळत आहे. नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला. (PHOTO CREDIT- PTI)

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. 2024 टी20 वर्ल्डकप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली. आता त्याचं लक्ष्य वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेकडे आहे. (PHOTO CREDIT- PTI)

रोहित शर्मा भारतासाठी आतापर्यंत 508 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात त्याने 20 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 111 अर्धशतकं आणि 50 शतकं आहेत. इतकंच काय आंतरराष्ट्रीय सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. (PHOTO CREDIT- PTI)