चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल होताच संजू सॅमसनने मोडला सुरेश रैनाचा विक्रम, काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेच संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात उतरला आहे. त्याची सुरूवात काही खास झाली नाही. पण त्यानंतर त्याने लय पकडली आणि दोन शतकं ठोकली. आता त्याने एक मोठा विक्रम रचला आहे.

| Updated on: Apr 26, 2026 | 5:46 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात सहभागी झाला. चेन्नई संघात रूजू होताच चर्चांना उधाण आलं होतं. पण या स्पर्धेच्या सुरूवातीला काही खास करू शकला नाही. त्यामुळे टीकाकारांनी त्याचावर निशाणा साधला. पण त्यानंतर त्याला सूर गवसला आणि त्याने धावांचा वर्षाव केला. (Photo: PTI)

2 / 5

आयपीएल 2026 स्पर्धेत त्याने एक नाही तर दोन शतकं ठोकली. यासह संजू सॅमसनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. संजू सॅमसनने आयपीएल स्पर्धेत वेगाने 5000 धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला. (Photo: PTI)

3 / 5

गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात काही खास करून शकला नाही. अवघ्या 11 धावा करून बाद झाला. पण त्याने आयपीएल स्पर्धेत 5 हजार धावा पूर्ण केल्या. त्याने 3555 चेंडूत ही कामगिरी केली. (Photo: PTI)

4 / 5

संजू सॅमसनने वेगाने हा टप्पा गाठणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने सीएसकेचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाची विक्रम मोडीत काढला आहे. त्याने 3620 चेंडूत ही कामगिरी केली होती. (Photo: PTI)

5 / 5

आयपीएल स्पर्धेत वेगाने 5000 धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 3288 चेंडूत ही कामगिरी केली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर डेविड वॉर्नर असून त्याने 3554 चेंडूत हा टप्पा गाठला आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us