
दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेत सेंट्रल झोनचा सामना नॉर्थ ईस्ट झोनशी होत आहे. सेंट्रल झोनकडून खेळताना 21 वर्षीय दानिश मालेवारने नॉर्थ ईस्टच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच छाप पाडली आहे. (फोटो- PTI)

दानिशने 222 चेंडूंचा सामना करत 203 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने 36 चौकार आणि एक षटकार मारला. दानिशने 16 डावातच ही कामगिरी केली आहे. (फोटो- Danish Instagram)

दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावणारा दानिश हा विदर्भाचा पहिला खेळाडू आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये फक्त चार फलंदाजांनी द्विशतक झळकावले आहे. यात यशस्वी जयस्वाल, बाबा अपराजित, बाबा इंद्रजीत यांचा समावेश आहे. (फोटो- Danish Instagram)

दानिश मालेवारच्या त्याच्या या खेळीच्या जोरावर सेंट्रल झोनने पहिल्या डावात 532 धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदारने या धावसंख्येवर डाव घोषित केला. (फोटो- Danish Instagram)

दानिश मालेवार 21 वर्षांचा असून रणजी ट्रॉफीच्या गेल्या पर्वात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दानिशने पहिल्या रणजी हंगामात 9 सामन्यांमध्ये 2 शतके आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 783 धावा केल्या. दानिशने विदर्भ प्रो लीगमध्येही शानदार फलंदाजी केली. (फोटो- Danish Instagram)