
प्रसिद्ध फुटबॉलपटू डेविड बेकहम हा तीन दिवसीय भारत दौऱ्यावर होता. या दौऱ्यादरम्यान डेविड बेकहम अनेकांना भेटला. या भेटींमधील चार जणांसोबतचे फोटो डेविडने शेअर केलेत.

भारत दौऱ्यात डेविड बेकहम याने बॉलिवू़ड अभिनेता शाहरूख खानची भेट घेतली. एक उत्तम अभिनेता आणि चांगल्या माणसाच्या घरी मला जेवणाचा आनंद लुटता आला, असं डेविक म्हणाला. तर त्याने शाहरुखला घरी आमंत्रितही केलं आहे.

भारत न्युझिलंड सेमी फायनल मॅचही डेविकने पाहिली. यावेळी क्रिकेटचा देव अर्थातच सचिन तेंडूलकर याची त्याने भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

क्रिकेट किंग विराट कोहली याने या सेमी फायनलमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. डेविडने कोहलीचीही भेट घेतली. या खास भेटीचा हा फोटो...

अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी डेविड बेकहमसाठी खास पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी त्याने आभार मानलेत. तसंच पुन्हा लवकरच भेटू, असंही डेविक म्हणाला आहे.