डेव्हिड मिलर आणि फाफ डुप्लेसिस यांनी एकाच दिवशी रचला विक्रम, टी20 मध्ये केलं असं की..

दक्षिण अफ्रिकेच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी एकाच दिवशी टी20 क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक पल्ला गाठला आहे. काही तासाच्या अंतरात एक विक्रम नोंदवला आहे. डेव्हिड मिलरने पहिल्यांदा विक्रमाची नोंद केली. त्यानंतर लगेचच फाफ डुप्लेसिसही त्या पंगतीत येऊन बसला.

| Updated on: Jan 20, 2025 | 5:25 PM
1 / 6
दक्षिण अफ्रिकेत टी20 लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत चमकदार कमागिरी करत फाफ डुप्लेसिस आणि डेव्हिड मिलर यांनी एकाच दिवशी एका विक्रमची नोंद केली आहे. एकाच दिवशी टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील 12व्या सामन्यात डेव्हिड मिलरने, तर 13 व्या सामन्यात फाफ डुप्लेसिसने विक्रम रचला आहे.

2 / 6
सेंच्युरियन सुपरस्पोर्ट पार्क येथे झालेल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीगच्या 12 व्या सामन्यात प्रिटोरिया कॅपिटल्सविरुद्ध पार्ल रॉयल्सकडून खेळणाऱ्या डेव्हिड मिलरने 24 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. या 48 धावांसह मिलर टी-20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण करणारा पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला.

3 / 6
डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेसह आणि इतर अनेक फ्रेंचायझी लीग संघांसाठी टी20 क्रिकेट सामने  खेळला आहे. त्याने 513 टी20 सामने खेळले असून 468 डावात 11046 धावा केल्या आहेत.  टी20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला.

4 / 6
डेव्हिड मिलरने 11 हजार धावा पूर्ण केल्यानंतर काही तासांतच फाफ डुप्लेसिसने या विक्रमाशी बरोबरी केली. फाफने जोबर्ग सुपर किंग्जकडून खेळताना डर्बन सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 38 चेंडूत 61 धावा केल्या.

5 / 6
दक्षिण आफ्रिकेसाठी टी20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. यासोबतच टी20 क्रिकेटमध्ये एक खास विक्रमही रचला गेला. एकाच दिवशी दोन खेळाडूंनी 11 हजार धावांचा टप्पा पार केला.

6 / 6
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. 2005 ते 2022 या कालावधीत ख्रिस गेलने वेस्ट इंडिजसह विविध संघांसाठी 455 डावांमध्ये एकूण 14562 धावा केल्या आहेत.