डेव्हिड वॉर्नरने कोहलीचा विक्रम मोडला, आता आयपीएल स्पर्धेतच विराटला मिळणार संधी

दुबईत आंतरराष्ट्रीय लीग टी20 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरची बॅट चांगलीच तळपली. रविवारी अबुधाबी नाइट रायडर्स विरुद्ध दुबई कपिटल्स सामना पार पडला. या सामन्यात डेविड वॉर्नरने आक्रमक खेळी केली. डेव्हिड वॉर्नरने या खेळीसह विराट कोहलीला टी20 क्रिकेटमध्ये मागे टाकलं आहे.

| Updated on: Feb 03, 2025 | 7:46 PM
1 / 5
आंतरराष्ट्रीय टी20 लीग स्पर्धा दुबईत सुरु आहे. या स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरचा झंझावात अबुधाबी नाईट रायडर्स सामन्यात पाहायला मिळाला. दुबई कॅपिटल्सकडून खेळताना डेव्हिड वॉर्नरने 57 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 93 धावा केल्या.

2 / 5
डेव्हिड वॉर्नर नाबाद 93 धावांच्या जोरावर टी20 क्रिकेटच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी विराट कोहली टॉप 5 मध्ये होता. विराट कोहलीला त्याने टॉप 5 मधून बाहेर काढलं.

3 / 5
विराट कोहलीने 2007 ते 2024 या कालावधीत 382 टी20 डाव खेळला. यात त्याने 9 शतके आणि 97 अर्धशतकांसह एकूण 12886 धावा केल्या आहेत. यासह टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. पण आता त्याची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. पण त्याला आयपीएल पुन्हा टॉप 5 मध्ये येण्याची संधी आहे.

4 / 5
डेव्हिड वॉर्नरने विराट कोहलीला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आतापर्यंत 397 टी20 डाव खेळणाऱ्या वॉर्नरने 8 शतके आणि 108 अर्धशतकांसह एकूण 12909 धावा केल्या आहेत.

5 / 5
वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल या यादीत पहिल्या स्थानावर आहे. 455 डावात 14562 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर किरोन पोलारल्ड असून त्याने 13537 धावा केल्यात. तिसऱ्या स्थानी शोएब मलिक असून त्याने 13492 धावा केल्यात. एडी हेल्स 13473 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.