
भारत आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेत दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघ भिडले होते. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. आता अंतिम सामन्यात पुन्हा ऑस्ट्रेलियाला पराभूत करत शेवट गोड करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने या विश्वचषकात 528 धावा करत एक खास विक्रम केला आहे. रोहित शर्माने केलेल्या विशेष विक्रमाची बरोबरी केली आहे.

2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने 648 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने या विश्वचषकातही 10 डावात 550 धावा केल्या. सलग दोन विश्वचषकांमध्ये 500 हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज होण्याचा विश्वविक्रम रचला आहे.

डेविड वॉर्नरने हिटमॅन रोहित शर्माच्या या खास विक्रमाची बरोबरी केली आहे. वॉर्नरने 2019 च्या विश्वचषकात एकूण 647 धावा केल्या होत्या.

डेविड वॉर्नरने 528 धावा करून सलग दोन विश्वचषकात 500 हून अधिक धावा पूर्ण केल्या आहेत. वनडे वर्ल्डकप पर्वात सलग 500 हून अधिक धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला.

विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली (711) धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक (594) आहे. न्यूझीलंडचा रचिन रवींद्र (578) धावांसह तिसऱ्या, डॅरिल मिशेल (552) चौथ्या आणि रोहित शर्मा (550) पाचव्या स्थानावर आहे.