
आयपीएल मिनी लिलावात गतविजेता आरसीबी संघ कशी बांधणी करतो याकडे लक्ष लागून होतं. कारण त्यांनी 17 खेळाडू आधीच रिटेन केले होते. त्यामुळे कोणत्या 8 खेळाडूंना प्राधान्य देणार याची उत्सुकता होती. मिनी लिलावात ही प्रक्रिया पार पडली असून 8 खेळाडूंसाठी बोली लावून घेतलं आहे. आता प्लेइंग 11 कशी असेल याची चर्चा रंगली आहे.

फिल सॉल्ट यावेळीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीचा फलंदाज असेल. गेल्या हंगामात आरसीबी संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली होती. त्यामुळे सॉल्ट यावेळीही धमाकेदार फलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे.

विराट कोहली फिल साल्टसह सलामीवीर म्हणून खेळणार हे निश्चित आहे. कारण साल्ट-कोहली जोडीने गेल्या हंगामात आरसीबी संघाला चांगली सुरुवात देण्यात यश मिळवले होते. त्यामुळे यावेळीही ते ही जोडी कायम ठेवतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वेंकटेश अय्यरसाठी सर्वात मोठी बोली लावली. त्याच्यासाठी 7 कोटी मोजले आणि संघात सहभागी करून घेतलं. वेंकटेश अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. गेल्या हंगामात देवथ पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. पण व्यंकटेश अय्यर हा अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याला यावेळी संधी मिळेल.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार पूर्वीप्रमाणेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत राहील. पाटीदारने गेल्या हंगामातही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्यामुळे त्याच्या क्रमवारीत बदल होण्याची शक्यता नाही.

जितेश शर्मा यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून मैदानात उतरेल हे निश्चित आहे. गेल्या हंगामात यशस्वी यष्टिरक्षक असलेला जितेश शर्मा पुढील हंगामातही प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. त्याने मागच्या पर्वात फिनिशरची भूमिका बजावली होती.

अनुभवी फिरकी अष्टपैलू कृणाल पंड्याला संघातून वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेल्या हंगामात आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यात कृणालने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो सर्वच सामन्यात खेळताना दिसेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी टिम डेव्हिडला फिनिशर म्हणून पाहिले जाईल. गेल्या हंगामात स्फोटक फलंदाजी करणारा टिम डेव्हिड सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाणार नाही.

रोमारियो शेफर्डने आरसीबीच्या विजयातही योगदान दिले. तो ऐनवेळी स्फोटक फलंदाजी करून सामन्याचं चित्र पालटू शकतो. खालच्या फळीत संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. तसेच गोलंदाजीतही मोलाचा वाटा असेल.

जोश हेझलवूड हा आरसीबीचा मुख्य वेगवान गोलंदाज असेल. गेल्या हंगामात अचूक आक्रमण करणारा हेझलवूड आयपीएलपर्यंत पूर्ण तंदुरुस्तीसह परतेल अशी आशा आहे. त्याचं संघात असणं प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणणारं आहे.

स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमार पुढील हंगामातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मैदानात उतरेल. हेझलवूडला त्याने मागच्या पर्वात उत्तम साथ दिली होती. त्यामुळे या पर्वात देखील तशीच रणनिती असेल यात काही शंका नाही.

आरसीबीने डावखुरा वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला तर यश दयालला निश्चितच संधी मिळेल. अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवला तर सुयश शर्मा मैदानात असेल. इम्पॅक्ट प्लेअरचा पर्याय असल्याने यश दयालला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते.

आरसीबी संघ : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेजलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान शर्मा, शुवान शर्मा, सुवान दारेश सिंह, अब्दुल सिंह, नुवान शर्मा अय्यर, जॉर्डन कॉक्स, जेकब डफी, विकी ओस्तवाल, कनिष्क चौहान, सात्विक देसवाल, मंगेश यादव, विहान मल्होत्रा. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)