दिनेश कार्तिकने मोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम, आयपीएल 2025 स्पर्धेत पुन्हा मान मिळवणार का?

दक्षिण अफ्रिकेत टी20 लीग स्पर्धा सुरु आहे. दिनेश कार्तिक ही स्पर्धा खेळणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. या स्पर्धेत दिनेश कार्तिकची बॅट चांगलीच तळपली. त्याने जोबर्ग सुपर किंग्जविरुद्ध अर्धशतक झळकावून महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे.

| Updated on: Feb 02, 2025 | 5:30 PM
1 / 5
दक्षिण अफ्रिकेत सध्या एसए20 लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत दिनेश कार्तिकने जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. अर्धशतकी खेळी करून त्याने एका खास विक्रमाची नोंद केली असून महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले आहे.

2 / 5
दक्षिण अफ्रिका टी20 लीग स्पर्धेच्या 26व्या सामन्यात पर्ल रॉयल्सकडून खेळताना दिनेश कार्तिकने 39 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. अर्धशतकासह टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

3 / 5
टी20 क्रिकेटमध्ये भारतीय यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 342 डावात फलंदाजी करत 28 अर्धशतकांसह 7432 धावा केल्या आहेत. आता हा विक्रम दिनेश कार्तिकच्या नावावर झाला आहे.

4 / 5
दिनेश कार्तिकने 362 टी20 सामन्यात 35 अर्धशतकांसह 7504 धावा केल्या आहेत.त्यामुळे टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.

5 / 5
महेंद्रसिंह धोनी हा विक्रम आयपीएल 2025 मध्ये मोडू शकतो.धोनीने या आयपीएलमध्ये 100 धावा केल्या तर तो टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक बनेल. दिनेश कार्तिक आयपीएल स्पर्धेत आरसीबी संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे.