KL Rahul : केएलचा चौथ्या कसोटीत मोठा कारनामा, ठरला पाचवा भारतीय

England vs India 4th Test : भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने इंग्लंडच्या भूमीत इतिहास घडवला आहे. केएलने इंग्लंडमध्ये खास कामगिरी करत पाचवा भारतीय होण्याचा बहुमान मिळवला आहे.

| Updated on: Jul 24, 2025 | 9:50 PM
1 / 5
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी भारताचा अनुभवी फलंदाज  केएल राहुल याने खास कामगिरी केली आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
केएलने पहिल्या डावात 98 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. केएलने या दरम्यान इंग्लंडमध्ये 1 हजार धावांचा टप्पा पार केला. केएल इंग्लंडमध्ये 1 हजार धावा करणारा पाचवा भारतीय ठरला आहे.   (Photo Credit : PTI)

3 / 5
केएलआधी भारतासाठी सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड आणि  विराट कोहली या चौघांनी इंग्लंडमध्ये 1 हजार धावा केल्या होत्या. केएलने इंग्लंडमध्ये 13 कसोटी सामन्यांमध्ये जवळपास 42 च्या सरासरीने 1 हजार धावा केल्या. (Photo Credit : PTI)

4 / 5
केएलने कसोटी कारकीर्दीत इंग्लंडमध्ये 4 शतकं झळकावली आहेत. केएलने इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात  शतक ठोकलं होतं. केएलचा इंग्लंडमधील 149 हा बेस्ट स्कोअर आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
केएलने आतापर्यंत अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमध्ये 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. केएलने या दरम्यान 1 अर्धशतक आणि 2 शतकं ठोकली आहेत. केएलची या मालिकेतील 137 ही सर्वोच्च खेळी राहिली आहे. (Photo Credit : PTI)