
इंग्लंड क्रिकेट टीमने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आगामी एशेज सीरिजच्या हिशोबाने तयारीला सुरुवात केली आहे. आयर्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला आहे. इंग्लंडच्या उपकर्णधारपदी नियुक्ती झालेल्या ओली पॉप याने द्विशतक ठोकलंय. (Photo: AFP)

क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये ओली पॉपने सामन्यातील दुसऱ्या दिवशी धमाका केला. ओलीने दुसऱ्या सत्रात चौथं शतक पूर्ण केलं. (Photo: AFP)

ओली पॉपने यानंतप तिसऱ्या सत्रातच द्विशतक ठोकलं. ओलीने अवघ्या 207 बॉलमध्ये ही कामगिरी केली. पोपने 205 धावा केल्या. पोपने या दरम्यान बेन डकेट याच्यासोबत 252 आणि त्यानंतर जो रुट याच्यासोबत 146 धावांची भागीदारी केली. इंग्लंडने 524 धावांवर डाव घोषित केला. (Photo: AFP)

पोपआधी ओपनर बेन डकेट याने आयर्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पोपने 182 धावा केल्या. या दरम्यान डकेटने डॉन ब्रॅडमॅन यांचा 93 वर्षांपूर्वींचा रेकॉर्ड ब्रेक केला. डकेट 150 बॉलमध्ये 150 धावांची खेळी केली. लॉर्ड्समध्ये ही वेगवान दीडशतकी खेळी ठरली. डॉन ब्रॅडमॅन यांनी 1930 मध्ये 166 बॉलमध्ये 150 धावा केल्या होत्या. (Photo: AFP)

या दोघांव्यतिरिक्त जो रुट याने अनोखा विक्रम केला. रुटने 56 धावांच्या खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. जो रुट अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला. (Photo: AFP)