ENG vs NZ Test : इंग्लंडचा पराभव आणि 32 वर्षानंतर असं घडलं, 11 विकेट घेणारा खेळाडू ठरला कारण
ENG vs NZ 2nd Test: न्यूझीलंडने इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात 253 धावांनी पराभूत केलं. यामुळे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. वेगवान गोलंदाज मॅट हेनरीने एकूण 11 विकेट घेत इतिहास रचला.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर इतिहास रचला. हेन्रीच्या भेदक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडला 253 धावांनी पराभूत केले. या विजयासह इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. (Photo: New Zealand Cricket Twitter)

इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या दिवशी 281 धावांची गरज होती आणि 5 गडी शिल्लक होते. शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने कमाल केली. शेवटच्या दिवशी खेळाच्या पहिल्या 50 मिनिटांतच हेन्रीने इंग्लंडच्या शेवटच्या पाच फलंदाजांना बाद केले. (Photo: New Zealand Cricket Twitter)

मॅट हेन्रीच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 209 धावांवर आटोपला. दुसर्या डावात मॅट हेन्रीने 18.1 षटकांत 29 धावा देत 6 फलंदाजांना बाद केले. त्याे या सामन्यात एकूण 11 बळी घेतले आणि न्यूझीलंडच्या विजयाचा नायक ठरला. (Photo: New Zealand Cricket Twitter)

मॅट हेन्रीने या सामन्याच्या पहिल्या डावात 5 बळी घेतले होते आणि दुसऱ्या 6 जणांना तंबूत पाठवलं. त्यामुळे बळींची एकूण संख्या 11 झाली. केनिंग्टन ओव्हलवर कसोटी सामन्यात 10 किंवा अधिक बळी घेणारा तो 2005 नंतरचा पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, मशेन वॉर्नने 2005 च्या ऐतिहासिक एशेस मालिकेदरम्यान येथे एका सामन्यात 10 बळी घेतले होते. (Photo: New Zealand Cricket Twitter)

मॅट हेन्री 1994 मध्ये डेव्हन माल्कमनंतर ओव्हलवर एका सामन्यात 10 किंवा अधिक बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना आता 25 जूनपासून ट्रेंट ब्रिजवर खेळला जाईल. हा सामना मालिकेसाठी निर्णायक ठरणार आहे. (Photo: ICC Twitter)