
इंग्लंडचा अनुभवी बॅट्समन बेन स्टोक्स याने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत तडाखेदार खेळी केलीय. स्टोक्सची वनडेत द्विशतक ठोकण्याची संधी अवघ्या 18 धावांनी हुकली. मात्र त्याने यासह अनेक विक्रम मोडीत काढले.

बेन स्टोक्सने याने न्यूझीलंड विरुद्ध 124 बॉलमध्ये 182 धावांची विक्रमी खेळी केली. स्टोक्स यासह इंग्लंडकडून वनडेत हाय स्कोअर करणारा पहिला बॅट्समन ठरला.

बेन स्टोक्स याने 182 धावांच्या खेळीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फोडून काढला. स्टोक्सने या खेळीदरम्यान तब्बल 15 चौकार आणि 9 खणखणीत षटकार ठोकले.

स्टोक्सने या खेळीसह टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा ऑलआऊट टोटलमधील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम मोडला आहे. यासह स्टोक्स आता ऑलआऊट टोटलमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरलाय.

इंग्लंड न्यूझीलंड विरुद्ध 48.1 ओव्हरमध्ये 368 धावांवर ऑलआऊट झाली. यामध्ये एकट्या स्टोक्सचं 182 धावांचं योगदान राहिलं. सचिनने 2009 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 175 धावांची खेळी केली होती. तेव्हा टीम इंडिया 351 धावांचा पाठलाग करताना ऑलआऊट 347 रन्स केल्या होत्या.