
दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीत इंग्लंडला 125 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेने पुरुष किंवा महिला अशा दोन्ही वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दक्षिण आफ्रिका महिला संघाचा वनडे आणि टी20 विश्वचषकातील हा सलग तिसरा अंतिम सामना आहे. गेल्या दोन टी20 विश्वचषक पर्वामध्ये अंतिम फेरी गाठली आहे. (Photo- Proteas Women Twitter)

35 र्षीय अनुभवी गोलंदाज मॅरिझाने कॅपने चेंडूने इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का दिला. एमी जोन्स आणि हिथर नाईटला शून्यावर तंबूत पाठवलं. त्यामुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला. इंग्लंडच्या प्रत्येक फलंदाजाला तिच्याविरुद्ध धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. (Photo- Proteas Women Twitter)

मॅरिझाने कॅपने फक्त 7 षटकं टाकली. त्यापैकी 3 निर्धाव षटकं टाकली आणि 20 धावा देत 5 गडी बाद केले. इंग्लंडच्या डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर एमी जोन्सला बाद करून तिने दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले . एमी जोन्स, हीथर नाईट, नॅट सायव्हर-ब्रंट, सोफिया डंकली आणि चार्ली डीनला बाद केले . (Photo- Proteas Women Twitter)

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मॅरिझाने कॅपने आपल्या नावावर केला. मॅरिझाने आता या स्पर्धेत एकूण 44 विकेट्स घेतल्या आहेत . यापूर्वी हा विक्रम भारताच्या झुलन गोस्वामीच्या नावावर होता. तिने 43 विकेट्स घेतल्या होत्या . (Photo- Proteas Women Twitter)

मॅरिझॅन कॅपने गोलंदाजीपूर्वी फलंदाजी करतानाही उत्तम कामगिरी केली होती. तिने 33 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 42 धावांची खेळी केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 7 गडी गमावून 319 धावा केल्या . (Photo- Proteas Women Twitter)