
इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात एक नवा विश्वविक्रम रचला. विशेष म्हणजे त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज एडम गिलख्रिस्टचा विश्वविक्रम मोडला. (फोटो- पीटीआय)

एमसीजी मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या पहिल्या डावात पाचव्या क्रमांकावर मैदानात आलेल्या ब्रूकने 34 चेंडूत 41 धावा केल्या.यासह हॅरी ब्रूकने कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या. हा पल्ला त्याने कमी चेंडूत गाठला हे विशेष..(फोटो- Gareth Copley/Getty Images)

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत 3000 धावा करण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक एडम गिलख्रिस्टच्या नावावर होता.(फोटो- पीटीआय)

एडम गिलख्रिस्ट कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त 3610 चेंडूत 3000 धावा केल्या होत्या. अशी कामगिरी करणारा सर्वात जलद फलंदाज ठरला होता. आता हॅरी ब्रूकने हा विक्रम मोडण्यात यश मिळवले आहे. त्याने गिलख्रिस्टपेक्षा 148 चेंडू कमी खेळून हा विक्रम केला. (फोटो- पीटीआय)

हॅरी ब्रूकने फक्त 3468 चेंडूत 3000 धावा पूर्ण केल्या. त्याने कसोटी इतिहासात सर्वात कमी चेंडूत 3000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला आहे. 54.18 च्या सरासरीने ही किमया साधली. येत्या काळात ब्रूककडून आणखी उत्तम विक्रमांची अपेक्षा आहे. (फोटो- पीटीआय)