ENGW vs SAW : वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत लॉरा वॉल्वार्डची शतकी खेळी, नावावर केला असा विक्रम

दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडसमोर विजयासाठी 320 धावांचं आव्हान ठेवलं आहे. यात कर्णधार लॉरा वॉल्वार्डचं 169 धावांचं योगदान आहे. लॉरा वॉल्वार्डने या खेळीसह एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Oct 29, 2025 | 7:19 PM
1 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले आहेत. दक्षिण अफ्रिकेने 50 षटकात 7 गडी गमवून 319 धावा केल्या आणि विजयासाठी 320 धावांचं आव्हान दिलं. यात लॉरा वॉल्वार्डची दीड शतकी खेळी महत्त्वाची ठरली. (Photo- South Africa Women Twitter)

2 / 5
इंग्लंडविरुद्ध लॉरा वॉल्वार्डने ऐतिहासिक खेळी करत मोठा पराक्रम केला आहे. यापूर्वी कोणत्याही दक्षिण अफ्रिकन महिला खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती. इतकंच काय तर  महिला विश्वचषक बाद फेरीत शतक झळकावणारी जगातील पहिली कर्णधार ठरली . (Photo- South Africa Women Twitter)

3 / 5
लॉरा वोल्वार्डने महिला विश्वचषक इतिहासातील पहिले शतक झळकावले. असा पराक्रम तिने यापूर्वी कधीही केला नव्हता. दुसरीकडे, महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच पर्वात 450 धावा करणारी पहिली कर्णधार ठरली.(Photo- South Africa Women Twitter)

4 / 5
लॉरा वोल्वार्डने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 5 हजार धावांचा टप्पा गाठणारी सहावी फलंदाज ठरली. तर हा टप्पा गाठणारी ती दक्षिण आफ्रिकेची पहिली फलंदाजही आहे. (Photo- South Africa Women Twitter)

5 / 5
वनडे सामन्यात सलामीवीर म्हणून सर्वाधिक 50हून अधिक धावा करत स्मृती मंधानाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. लॉरा वोल्वार्ड आणि स्मृती मंधानाने आतापर्यंत 48 वेळा एकदिवसीय सामन्यात 50हून अधिक धावा केल्या आहेत. (Photo- South Africa Women Twitter)