Erling Haaland: एर्लिंग हालँड नॉर्वेच्या विजयाचा शिल्पकार, सलग 13 सामन्यात केली अशी कामगिरी

एर्लिंग हालँड नॉर्व फुटबॉल संघाचा तारणहार ठरला आहे. त्याच्या गोलच्या जोरावर नॉर्वेने आयव्हरी कोस्टला बाद फेरीत 2-1 ने मात दिली. इतकंच काय तर हालँडने एक गोल करताना मेस्सी, रोनाल्डो आणि एम्बाप्पेसारख्या दिग्गज खेळाडूंना धोबीपछाड दिला आहे.

| Updated on: Jul 01, 2026 | 4:33 PM
1 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत नॉर्वे संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. राउंड 32 मध्ये नॉर्वेने आयव्हरी कोस्टचा 2-1 ने पराभव केला. या विजयासह उप उपांत्यपूर्व फेरीत  जागा मिळवली आहे. एर्लिंग हालँडने 86व्या मिनिटाला गोल मारला आणि नॉर्वेने विजयी पतका फडकावली. आता राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलशी सामना होणार आहे. (GETTY IMAGES)

2 / 5
फिफा क्रमवारीत 31व्या क्रमांकावर असलेल्या नॉर्वेने यापूर्वी वर्ल्डकप स्पर्धेत दोन वेळा विजय मिळवला नव्हता. पण यंदाच्या वर्ल्डकपमध्ये नॉर्वेने करून दाखवलं आहे. या स्पर्धेत हालँडने कमाल केली असून एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. (GETTY IMAGES)

3 / 5
एर्लिंग हालँडने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 5 गोल मारले आहे. त्याने ही कामगिरी फक्त तीन सामन्यात केली आहे. वर्ल्डकप स्पर्धेत 5 गोल मारण्यासाठी दिग्गज फुटबॉलपटू असलेल्या ब्राझीलच्या रोनाल्डोला 8 सामने, लियोनल मेस्सीला 11 सामने आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला 14 सामने लागले होते. (GETTY IMAGES)

4 / 5
एर्लिंग हालँडने मागच्या 13 व्यावसायिक सामन्यात गोल मारले आहे. त्यामुळे त्याची ही कामगिरी उल्लेखनीय आहे. एर्लिंगने मागच्या 16 सामन्यात जेव्हा कधी गोल मारला तेव्हा संघाचा विजय झालेला आहे. हालँड नॉर्वेसाठी वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोल मारणारा खेळाडू ठरला आहे. (GETTY IMAGES)

5 / 5
एर्लिंग हालँडने आंतरराष्टीय सामन्यात आतापर्यत 60 गोल मारले आहेत. त्याने ही कामगिरी फक्त 53 सामन्यात केली आहे. त्याच्या आधी ही कामगिरी एम्बाप्पेने 101 सामन्यात केली होती. तर जर्मनीच्या गर्ड मूलरने फक्त 48 सामन्यात 60 गोल मारले आहेत. (GETTY IMAGES)

Follow Us