IPL 2026 : तुम्हालाही अभिमान वाटेल, आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार

आयपीएल स्पर्धेचं यंदा 19वं पर्व आहे. आतापर्यंत झालेल्या 18 पर्वापेक्षा हा हंगाम थोडा वेगळा असणार आहे. त्याला कारणंही तसंच आहे. आयपीएल स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झालं आहे. असं असताना भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब आहे.

| Updated on: Mar 23, 2026 | 5:00 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच एक दुर्मिळ विक्रम नोंदवला गेला आहे. पहिल्यांदाच सर्व दहा संघांचं नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे असणार आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये निदान एक तरी विदेशी कर्णधार असायचा. मात्र या पर्वात सर्व दहा कर्णधार भारतीय आहेत. मागच्या 18 हंगामांमध्ये शेन वॉर्नपासून ते ॲडम गिलक्रिस्ट, डेव्हिड वॉर्नर, फॅफ डु प्लेसिस आणि पॅट कमिन्सपर्यंत अनेक विदेशी खेळाडूंनी संघांचे नेतृत्व केले आहे. पण यावेळी सर्व 10 संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडू करत आहेत. (Photo- IPL/BCCI)

2 / 5

पॅट कमिन्स दुखापतग्रस्त असल्याने सनरायझर्स हैदराबादने संघाचं नेतृत्व इशान किशनकडे सोपवलं आहे. त्यामुळे हा विक्रम नोंदवला गेला आहे. पॅट कमिन्स मधल्या टप्प्यात परतेल की नाही हे सांगता येत नाही. जर परतला नाही तर या संपूर्ण हंगामात भारतीय कर्णधार म्हणून नोंद होईल. (Photo- IPL/BCCI)

3 / 5

इशान किशनने झारखंडला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिल्याचा अनुभव असल्यामुळे सनरायझर्स बोर्डाने त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. इशान किशन पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत कर्णधाराची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद कशी कामगिरी करते याकडे लक्ष असणार आहे. (Photo- IPL/BCCI)

4 / 5

मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या, चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड, राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान पराग आणि गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुबमन गिल करत आहेत.दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेलकडे आहे.(Photo- IPL/BCCI)

5 / 5

लखनौ सुपरजायंट्सची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरची जबाबदारी रजत पाटीदारकडे आहे.केकेआरला विजेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यर मागच्या पर्वापासून पंजाब किंग्सचा कर्णधार आहे. तर केकेआर संघाची धुरा अनुभवी अजिंक्य रहाणे करत आहे. (Photo- IPL/BCCI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us